PMP आणि मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! तिकिटांबाबत घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या..


पुणे : पुणेकरांनो सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल होणार आहे. PMPML आणि पुणे मेट्रो प्रवाशांना आता वेगवेगळ्या ॲप्सची कसरत करावी लागणार नाही. दोन्ही संस्थांनी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका मोबाईल ॲपमधूनच बस आणि मेट्रोचे तिकीट खरेदी करण्याची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचे नियोजन सुलभ होईल आणि तिकीट प्रक्रियेत लागणारा वेळ वाचणार आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत PMPML प्रशासन आणि मेट्रो प्रशासन यांनी तिकीट प्रणाली एकमेकांच्या सॉफ्टवेअरशी जोडण्यासाठी आवश्यक API हस्तांतरणावर सहमती दर्शवली आहे. पुढील आठवड्यात दोन्हींच्या तांत्रिक विभागांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, सेवेला कधीपासून सुरूवात करायची यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

PMPML चे अध्यक्ष पंकज देवरे यांनी विषयाला गती दिल्याने अंमलबजावणीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. सध्या ‘आपली PMPML’ ॲपचा वापर सुमारे १० लाख प्रवासी करतात, तर मेट्रो ॲपचे एक लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत.

प्रस्तावित व्यवस्थेत या दोन्ही ॲप्सची तांत्रिक माहिती, प्रवाशांची खाती आणि तिकीट व्यवहारांची नोंद सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परस्पर हस्तांतरित केली जाणार आहे. परिणामी, वापरकर्त्याला वेगळे ॲप डाऊनलोड करण्याची किंवा स्वतंत्र लॉगिन तयार करण्याची गरज कमी होईल.

एकात्मिक तिकीट प्रणाली लागू झाल्यानंतर, प्रवाशांना एका इंटरफेसवर बस आणि मेट्रो दोन्हीचे पर्याय दिसतील. आवश्यक प्रवास निवडून डिजिटल पेमेंटद्वारे त्वरित तिकीट मिळेल. एकाच पावतीवर दोन्ही प्रवासाची पुष्टी मिळाल्याने तपशील जपण्याच टेन्शन कमी होईल. ही सोय दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे शहरातील बस आणि मेट्रो सेवांमध्ये समन्वय वाढेल. गर्दीच्या वेळेत मार्ग, वेळापत्रक आणि कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन प्रवासी आपला प्रवास अधिक अचूकपणे आखू शकतील. एका ॲपवरच सगळे पर्याय उपलब्ध असल्याने तिकीट रांगा, काऊंटरवरील विलंब आणि ॲप-स्विचिंगचा त्रास कमी होईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!