पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! PMP चा स्मार्ट निर्णय, आता ‘या’ ठिकाणी होणार नवीन थांबा…


पुणे : पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून पुणे शहरात पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आता सांगवी परिसरात बस थांबण्याची सुविधा सुरू झाली आहे.

तसेच जुन्या बसथांब्याची अवस्था खराब असल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत होते, मात्र आता नव्या बसथांब्यावर बस थांबण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सांगवीतील बाबूरावजी घोलप महाविद्यालयाजवळ स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्या पीएमपी बसथांब्यावर आता बस थांबण्यास सुरुवात झाली आहे.

सुरक्षित आणि सोयीस्कर होणार प्रवास…

दरम्यान, यामुळे परिसरातील विद्यार्थी, रहिवासी आणि महिला प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे. जुन्या बसथांब्यामुळे पूर्वी वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असे, आता ही समस्या कमी झाली आहे.

रक्षक चौक ते सांगवी फाटा या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होईल आणि बस अधिक सुरक्षितपणे थांबू शकतात. नवीन बसथांब्यासमोरील अतिक्रमणे हटवण्यात आल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करताना कोणताही त्रास जाणवणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!