लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ; ‘या ‘महिन्यात डिसेंबर- नोव्हेंबरचे एकत्र 3000 रुपये जमा होणार?

पुणे : राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच मोठं गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबरचा महिना सुरु झाला तरी आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. मात्र या योजनेबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेबर महिन्याचे दोन्ही हप्ते जमा होणार आहेत.

महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.आता या लाडक्या बहिणींना सरकार नवीन वर्षाचं गिफ्ट आताच देण्याची शक्यता आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होतील. त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होतील. बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होणार आहेत.अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी E-KYC करणे बंधन करण्यात आले आहे. त्यानुसार ekyc केली नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. अन्यथा तुमचा निधी थांबवण्यात येईल. कशी करावी ही ई केवायसी?

घर बसल्या अशी करा E-KYC
अगोदर ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा
होम पेजवरील ईकेवायसीवर क्लिक करा. आता ई-केवायसी फॉर्म उघडेल
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याला त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवावा लागेल
आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या. ओटीपीवर क्लिक करा
आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी सबमिट करा
जर ईकेवायसी अगोदरच झाले असेल तर तसा मॅसेज येईल
जर ईकेवायसी पूर्ण झाली नसेल तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासा.
