लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ; लवकरच 2100 रुपयेचा हप्ता मिळणार, मंत्र्यांच मोठ विधान

पुणे: मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेतुन महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देऊनही अद्यापही महिलांच्या खात्यावर 2100रुपये जमा होत नाहीत. लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. यावरून वारंवार टीका करणाऱ्या विरोधकांना आता मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लाडकींना 2100 रुपये हफ्ता देण्याबाबत मोठं विधान केले आहे. ते म्हणाले,’लाडक्या बहिणीना 2100 देण्यासाठी आमचा अभ्यास सुरु आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही गैरसमजला बळी पडू नये’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत, असे स्पष्ट त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील पक्षांनी प्रचार करताना आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता 1500 रुपयांवरून 2100रुपयांवर करू अशी घोषणा केली होती.महायुती सरकार येऊन बरेच महिने झाले तरी देखील सरकारने अद्याप 2100 रुपये हफ्ता देण्यास सुरूवात केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी 2100 रुपयांचा हफ्त्याबाबत सरकार कधी घोषणा करत आहे याची वाट पाहत आहे. आता लवकरच लाडकीनां 2100रुपये मिळणार आहेत.

