लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! महापालिका निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान,लवकरच ‘या ‘महिन्यात जमा होणार रक्कम


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमतानंतर लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. पाच फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान पार असेल. या निवडणुकीआधी हप्ता जमा केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत संक्रातीच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेले तीन हजार रुपये एकत्र देण्याच आश्वासन रद्द केल्यानंतर लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला होता. त्यावेळी आचारसंहितेच्या कारणास्तव फक्त डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले. मात्र आता लवकरच लाडक्या बहिणींना सरकार हप्ता देण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारीचा हफ्ता देऊ अशी ग्वाही दिली होती.आता
महापालिका निवडणुकीनंतर आता फडणवीस सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. जानेवारीचा हप्ता 5 फेब्रुवारी आधीच पात्र महिलांना मिळणार अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.

दरम्यान आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना 1500 मिळण्याची शक्यता आहे.अद्याप सरकारने हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण जिल्हा परिषद मतदानाच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील 18 – 20 दिवसांच्या काळात जानेवारी महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!