आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! केरळ हापूस पुण्यात दाखल…!
पुणे : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. यामुळे सर्वांना आंब्याची चाहूल लागली आहे. असे असताना आता पिंपरीतील बाजारपेठेत सध्या केरळ हापूसच्या काही पेट्या दाखल झाल्या आहेत. यामुळे आता आंब्याची चव चाखता येणार आहे.
रत्नागिरी व देवगड हापूसचे दर चढे असल्याने आणि मागणी कमी असल्याने त्यांच्या पेट्या मात्र विक्रीसाठी आलेल्या नाही. पर्यायाने, रत्नागिरी आणि देवगड हापूसची प्रतीक्षा आहे.
यंदा मार्च महिना उजाडला तरी अद्याप रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या पेट्या पिंपरी बाजारपेठेत दाखल झालेल्या नाही. सध्या केरळ हापूसच्या काही पेट्या दाखल झाल्या आहेत. यामुळे हा आंबा तरी आता चाखता येणार आहे.
एक हजार ते 1 हजार 600 रुपये डझन दराने हा आंबा विकला जात आहे. येत्या 10 ते 15 तारखेनंतर हापूस आंब्याची बाजारपेठेत आवक सुरू होईल. तेव्हापासून दर देखील कमी होतील. अशी माहिती फळ विक्रेते कुमार शिरसाट यांनी दिली आहे.
पिंपरीतील फळबाजारामध्ये बदाम आणि लालबाग हा आंबा मात्र विक्रीस आलेला आहे. 100 ते 200 रुपये किलो या दराने बदाम आंबा विकला जात आहे. यंदा अवकाळी पावसामुळे देखील मोहोर झडून गेला आहे.