सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महागाई भत्त्यात होणार वाढ, जाणून घ्या..


पुणे : सातव्या वेतन आयोगांतर्गत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर, आता विविध राज्य सरकारेही त्या पावलावर पाऊल टाकत आहेत.

महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात आली असून यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू यांसारख्या असंख्य राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला आहे.

मात्र अजूनही महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता ५३% एवढाच आहे. मात्र येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सुधारित होईल अशी आशा आहे.

राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ५३ टक्क्यावरून 55% एवढा होणार असून ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. साधारणता जून महिन्यात याबाबतचा निर्णय होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

दरम्यान आता महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती फडणवीस सरकारमधील परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

आता या यादीत मध्य प्रदेश राज्याचाही समावेश झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काही दिवसांपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती, आणि त्यानुसार ८ मे २०२५ रोजी तेथील वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार, मध्य प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ५०% दराने मिळणारा महागाई भत्ता थेट ५५% करण्यात आला आहे, म्हणजेच त्यात एकूण ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ दोन टप्प्यांत लागू करण्यात आली आहे: जुलै २०२४ पासून तीन टक्के आणि जानेवारी २०२५ पासून दोन टक्के. मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांनाही ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाल्याने त्यांनाही थकबाकी मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!