सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! दरात झाली मोठी घसरण, चेक करा सोन्याचे लेटेस्ट दर….

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
अशातच आता सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल ₹3240 इतकी मोठी घसरण झाली आहे. सलग सातव्या दिवशी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे दर खाली घसरले असून, यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिल्लीत 99.9 टक्के शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 97,470 रुपयांवर आली आहे. याआधी ती 97,670 रुपये होती. चांदीच्याही दरात घसरण झाली असून, सोमवारी चांदी ₹200 ने कमी होऊन 1 किलोसाठी 1,02,800 रुपयांवर आली आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींमागे जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक बदलांचा आणि राजकीय परिस्थितीचा मोठा परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
डॉलर निर्देशांकातील घसरण…
डॉलरची किंमत घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर खाली आले आहेत. गेल्या महिन्यात डॉलर निर्देशांकात 1.5% घट झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने महागाई कमी झाली आहे. यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे कल काहीसा कमी झाला आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचे स्वरूप सौम्य झाले आहे. युद्धजन्य वातावरणावर विराम लागल्याने सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली आहे.
जागतिक पातळीवर आर्थिक वातावरण स्थिर झाल्याने सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी कमी झाली आहे. यामुळे किंमतीत घसरण झाली आहे.
अमेरिका आणि अन्य राष्ट्रांदरम्यान व्यापारविषयक करारांमध्ये सकारात्मक हालचाल झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे आणि ते सोन्याऐवजी अन्य पर्याय निवडत आहेत.