शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय…

नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकरी २२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी तीन टप्प्यांत प्रत्येकी २००० रुपये थेट खात्यात जमा केले जातात. मात्र यावेळी काही शेतकऱ्यांना केवळ २००० नव्हे तर थेट ४००० रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या १९ नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता जमा झाला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे किंवा अर्जातील त्रुटींमुळे हा हप्ता मिळाला नव्हता. आता या शेतकऱ्यांनी त्रुटी दूर केल्यास आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास, त्यांना मागील हप्त्यासह चालू हप्ता मिळून एकूण ४००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांना २१ वा हप्ता मिळालेला नव्हता आणि त्यांनी आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तसेच अर्जातील चुका दुरुस्त केल्या आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना दोन हप्त्यांची रक्कम एकत्र मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या खात्यात थेट ४००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे.

याशिवाय, नियमितपणे सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे २२व्या हप्त्याचे २००० रुपये मिळतील. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी कायम आहेत, अशा लाभार्थ्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे तपासून दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.