शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता घरी बसून मिळणार पीक कर्ज, असा करा अर्ज…


पुणे : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणं, कागदपत्रांची दगदग आणि वेळेचा अपव्यय ही दीर्घकाळची समस्या होती.

मात्र आता केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी घरबसल्या पीक कर्ज मंजुरीची नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भात तिघांमध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला असून अकोला जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जनसमर्थ पोर्टलवरून किसान क्रेडिट कार्ड व पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ मोबाईलवर काही क्लिक करून कर्ज मिळू शकते.

ॲग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे पोर्टलशी एकात्मिकीकरण झाल्याने कर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, कागदपत्रविरहित आणि पारदर्शक झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक असून शेतकरी ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. सुरुवातीला ही सुविधा फक्त स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी www.jansamarth.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. नंतर Agri Loan – Kisan Credit Card हा पर्याय निवडावा. जिल्ह्याचे नाव व आधार क्रमांक भरून ई-केवायसी तपासणी केल्यानंतर वैयक्तिक, बँक, आर्थिक व जमिनीचे तपशील सादर करावे. शासन आणि बँकांच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज मंजूर होईल.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार आहे. बँकांच्या चकरा टाळल्या जातील आणि कर्जप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील. डिजिटल प्रणालीमुळे अर्ज, तपासणी आणि मंजुरीची माहिती थेट मोबाईलवर मिळणार आहे. खरीप हंगामासाठी निधी वेळेत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!