Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बँक ऑफ महाराष्ट्रकडून शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना; जाणून घ्या..

Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रकडून शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना राबवल्या जात असून शेतकऱ्यांना आता टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे.

हे लक्षात घ्या की वाहनांच्या किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम तसेच आरटीओ शुल्क शेतकऱ्यांना सुरवातीला भरावे लागेल. ज्याला तुम्ही डाऊन पेमेंट म्हणू शकता. डाऊन पेमेंट भरल्यानंतर कमाल २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना मिळेल. मंजूर झालेल्या कर्जासाठी एक वर्षाचा एमसीएलआर + 3.15%P.A. व्याजदर द्यावे लागेल.
या योजनेअंतर्गत १.६० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वाहनाचे हायपोथेकेशन करण्यात येईल. १.६० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या रक्कमेसाठी वाहनाचे हायपोथेकेशन आणि जमीन गहाण/तृतीय पक्षाची हमी घेतली जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हप्ते भरून कर्जाची परतफेड करता येईल.

पात्रता
शेतकरी, कुक्कुटपालन, पशुपालन, रेशीम उत्पादन अशा इतर शेतीशी निगडित व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक यासाठी पात्र असतील. अर्जदार शेतकऱ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा. अर्जदाराचे वय किमान १८ आणि कमाल ७० वर्षे वयोगटातील असावे. अर्जदार शेतकऱ्याचे किमान दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न असावे. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागेल.
येथे करा अर्ज
कर्जासाठी शेतकऱ्यांना https://digiloans.bankofmaharashtra.in/apply/farmervehicleloan?bom या लिंक वर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.