शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारचे मोठे गिफ्ट….!
मुंबई : शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सध्या शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि याच योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
आता शिंदे सरकारने शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतच्या प्रोत्साहन पर लाभासाठी राज्य सरकारकडून 700 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सरकारने याआधी 2900 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असुन आता 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
असे असले तरी यामुळे सरकारी तिजोरीवर 4700 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा निर्णय लांबला होता. कोरोना स्तिथी मुळे हा निधी रखडला होता.