लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज!! ‘या’ दिवशी होणार 2100 रुपयांची घोषणा, उरले फक्त काही दिवस…


मुंबई : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत हालचाल सुरू आहेत.

मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात 2100 रुपये मिळणार नाही. मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार मोठी घोषणा करू शकतात आणि एप्रिल 2025 पासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणारी महिला जर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असल तर यापुढे या महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जर महिला महाराष्ट्राची रहिवासी नसेल तर त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही सांगितले गेले आहे.

तसेच महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरीही देखील यापुढे महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याच बरोबर जर महिला सरकारी विभागात कार्यरत असेल तरी देखील महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे आता नियम बदलले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 ऐवजी 2100 रूपये मिळणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. यामुळे याकडे बहिणींचे लक्ष लागले असून आता अर्थसंकल्प सादर करताना याबाबत सविस्तर घोषणा होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!