लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! १५०० रुपये खात्यात जमा, तुम्हाला आले की नाही? झटपट करा चेक…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या, तो हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबर रोजी राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून, अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत.

वर्ष २०२५ चा शेवट गोड करत राज्य सरकारने लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि ज्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांच्या खात्यात प्राधान्याने ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अनेक महिलांना मोबाईलवर एसएमएस अलर्ट मिळाल्याने योजनेचा लाभ मिळाल्याची खात्री झाली आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित २००० रुपये मिळतील, अशी अपेक्षा अनेक महिलांना होती. मात्र, सध्या नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित हप्ता पुढील प्रक्रियेनंतर जमा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे
