लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! मार्च महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार, 1500 रुपयांचा खडखडाट

पुणे : लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या मार्चच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या असताना लवकरच हा हप्ता खात्यावर जमा होण्याची माहिती समोर आली आहे.येत्या 25 एप्रिलनंतर निकषात असणाऱ्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा 1500 रुपयेचा हप्ता जमा होणार असल्याच समोर आल आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात 19 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.25 एप्रिलनंतर निकषात असणाऱ्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात 1500 रूपये डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जातील.
दरम्यान या योजनेतील अटीनुसार आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न असेल त्या महिलांच्याच खात्यात 1500 रूपये जमा होतील.
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? याबाबतची माहिती मिळणार आहे. ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. लॉगिन झाल्यावर ‘अर्जाची स्थिती’या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल.

लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च-एप्रिल असे दोन महिन्यांचे 3000 रूपये जमा होणार की फक्त मार्च महिन्याचे 1500 येणार, याची उत्सुकता शिगेला लागली होती. आता येत्या 25 एप्रिल नंतर महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार असल्याच समोर आल आहे.
