लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आठवड्याभरातच खात्यात खडखडाट, 3000 रुपये जमा होणार?

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची हफ्ते काही महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत. आता महिलांना लवकरच पैसे दिले जाणार आहे. यासाठी सामाजिक व न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आला आहे. दोन्ही महिन्याचे असे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता यावेळी एकच हप्ता देणार की दोन्ही हप्ते एकत्रितपणे देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले असताना हफ्ते एकत्र जमा होणार आहेत.लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारकडून आता निधी वितरित करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे.
दरम्यान या योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून जवळपास 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीतून महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे. महिलांच्या खात्यात खडखडाट होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांनी ई -केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत. केवायसी पूर्ण करून निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे दिले जाणार आहेत. आता हे पैसे कधी जमा होणार याकडे बहिणींच लक्ष लागलं आहे.