ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या प्रति तोळ्यामागे 380 रुपयांची घसरण; वाचा 22 अन् 24 कॅरेटचे दर काय?


पुणे : इराण – इस्राईलच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोन्या -चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते. त्यानंतर आता सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे.प्रति तोळ्यामागे 380 रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 380 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,52,460 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 304 रुपयांनी घसरले असून 1,21,968 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोनं 3800 रुपयांनी घसरले असून 15,24,600 रुपये झालं आहे.

22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 350 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 1,39,750 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोनं 280 रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर 1,11,800 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे 3500 रुपयांची घसरण झाली आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 290 रुपयांनी घसरले असून 1,14,340 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 232 रुपयांनी घसरले आहेत. हे दर 91,472 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोनं 290 रुपयांनी स्वस्त झालं असून 1,14,340 रुपये झाले आहे. 10 तोळ्यामागे सोन्याचे दर 2900 रुपयांनी घसरले असून 11,43,400 रुपये झाले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील गुंतवणूक ही कधीच तोट्याची ठरत नाही. तुम्हाला नेहमीच फायदा होतो.त्यामुळे सोनं घेण्यासाठी खरेदीदारांची नेहमी गर्दी पाहायला मिळते. मात्र, मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!