सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्य तेलाच्या किंमती होणार कमी..
पुणे : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. तेलाच्या किंमती कमी होणार आहे. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, यांची मागणी कमी होण्याचे प्रमाण बंद झाले आहे. यावर्षी ब्राझील आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतल्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणार नाही.
मिळालेल्या माहिती नुसार, सोयाबीनच्या उत्पादनामुळे तेलबियाच्या किंमती या वाढणार नाहीत. व यामुळे तेलबियांची मागणी न होता सोयाबीनची मागणी वाढेल. व खाद्यतेलाचे दर हे कमी होतील. या कारणांमुळे सोयाबीन धान्य आणि सोयाबीन डिओइल्ड केक (डीओसी) च्या भावांमध्ये खंडणी पडणार आहे.
तसेच महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीनचा पुरवठा मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणावर करत आहेत. यामुळे सोयाबीनच्या तेलामध्ये घसरण होताना दिसून येत आहे. आत्तापर्यंत स्थित असलेला कांडला बंदरावर खाद्य तेलाचा प्लाट चीनी बहुराष्ट्रीय कंपनी फिक्स ड्युटीवर ३० जूनपर्यंत 82 रुपये प्रति लिटर याप्रमाणे सोयाबीन तेलाची विक्री करत होते.
सध्या सरकारने यामध्ये आयात शुल्क वाढवले असले तरी ग्राहकांना 82 रुपये प्रति लिटरने खाद्यतेल मिळणार आहे. कोणताही तेल खाद्यदार या प्लाट वरून खरेदी करू शकणार आहे.