दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीची मिळणार सुवर्णसंधी, असा करा अर्ज…

मुंबई : तुम्ही १० वी पास करून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण भारतीय डाक विभागाने हायस्कूल पास झालेल्या तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे.
तसेच एकूण २१,४१३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही पदे देशातील विविध राज्यांमध्ये भरली जातील. अर्ज प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्चपर्यंत आहे.
पात्रता काय असावी?
अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. तसेच, अर्जदाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षे, एससी आणि एसटी प्रवर्गाला ५ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सूट देण्यात आली आहे.
या राज्यांमध्ये संधी..
ग्रामीण डाक सेवक पदांची भरती उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांसाठी आहे. सर्वाधिक पदे उत्तर प्रदेश आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये आहेत. अर्ज केल्यानंतर, उमेदवार ६ मार्च ते ८ मार्च दरम्यान त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात.
अर्ज शुल्क…
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
मुख्य पृष्ठावरील अर्ज लिंकवर क्लिक करा.
आता नोंदणी करा आणि अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
एकदा सर्व माहिती तपासा आणि अर्ज सबमिट करा.
निवड प्रक्रिया..
उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर तयार केलेल्या मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. मेरिट लिस्टमध्ये निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.