शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारची ट्रॅक्टर अनुदान योजना, मिळणार 5 लाख रुपये, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया…

सध्या शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणून सरकारने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या योजनेत ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ५ लाखांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के आणि ४० टक्के अशा दोन वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे सोप्प जाणार आहे.
यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती करणे सोपे जाईल, असा या योजनेमागील मुख्य हेतू आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. महाडीबीटी ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे.
याठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करून अनुदान मिळवता येईल. ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. याचा लाभ घेऊन अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत सुधारणा करू शकतात.
यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा उतारा, जमिनीचा अ अकार, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जात प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांची अनेक कामे सोपे होऊ शकतात.
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना ही एक सुवर्णसंधी असून याबाबत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.