कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल, मोदी सरकारचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. आता लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. कॅबिनेटने आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे.
याबाबत कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
याबाबत २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती. २०१६ मध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत माहिती लवकरच सांगण्यात येईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आता आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याआधी केंद्रिय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत होता. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती.