वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, जाणून घ्या…

नवी दिल्ली : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत असून, याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती एप्रिल महिन्यात ६५ ते ७० डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान राहिल्या, तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ३ ते ५ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे.
तसेच केंद्र आणि राज्य सरकारांनी यावर कर कपात करण्याचा निर्णय घेतल्यास ही कपात अधिक वाढू शकते. जर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या, तर वाहतूक खर्च कमी होईल आणि त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या किमतींवरही दिसून येईल. यामुळे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालवाहतूक खर्च घटल्याने अन्नधान्य, भाज्या, जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाशी संबंधित इतर उद्योगांवर सकारात्मक परिणाम होईल. महागाई थोडीफार नियंत्रणात राहील आणि सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, अनेक गोष्टी या पेट्रोल डिझेलवरच अवलंबून असतात.
सध्या आखाती देशांतील कच्च्या तेलाच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी प्रति बॅरल ७० डॉलरच्या घरात आहेत. अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती गेल्या दोन दिवसांपासून ६६ डॉलर प्रति बॅरलवर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान, अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने देशांतर्गत तेल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दोन व्यापार सत्रांमध्ये अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती ६६ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर स्थिर आहेत. यामुळे येणाऱ्या काळात दर अजून कमी होण्याची शक्यता आहे.