लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून, जुलै महिन्याचा हप्ता सोबतच मिळणार, पण ‘या’ महिलांना मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या..


मुंबई : लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांना जून आणि जुलै महिन्याचा हफ्ता म्हणजेच बारावा आणि तेरावा हप्ता एकाच वेळी दिला जाऊ शकतो. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जातील असे सांगितले जात आहे.

सहा जुलै च्या सुमारास या दोन्ही हप्त्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळू शकतो. या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्या कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरतील.  वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

तसेच सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना, तसेच सरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. आता जून आणि जुलै या दोन्ही हफ्त्याचा लाभ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर खरच दिला जाईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, या योजनेचा लाभ नियमात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच दिला जाणार आहे. म्हणजे ज्या महिला या योजनेच्या नियमात बसत नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. अनेक नावे यामध्ये कमी करण्यात आली आहेत. जवळपास दहा लाख नावे कमी झाली आहेत.

दरम्यान, आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या एकूण 11 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!