आनंदाची बातमी! कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी स्तरावर, आता पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, जाणून घ्या…

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ- मोठे निर्णय घेतले आहे. तसेच त्यांच्यामुळे जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती ३ वर्षांच्या नीचांकी स्तरावर आल्या आहेत.
कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत तसेच गेल्या चार दिवसांत यात तब्बल ६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.त्यामुळे भारतात महागाईने होरपळत असलेल्या जनतेला दिलासा मिळेल असे वाटत आहे.
‘सीआरईए’ च्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती इतक्या खाली आलया आहेत.२०२५ च्या दुसऱ्या तिमाही पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती आणखी घसरून ६० डॉलर प्रति बॅरलवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारत सरकारचा देशाबाहेर जाणारा पैसा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
तसेच ११२.५ अब्ज युरो कच्च्या तेलासाठी तर कोळशासाठी १३.२५ कोटी रुपये भारताने युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून खर्च केले आहेत.
कच्च्या तेलासाठी भारताचे ११२.५ अब्ज युरो खर्च – जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक आणि आयातदार असलेल्या भारताने युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ११२.५ अब्ज युरो खर्च केले आहेत.
यामुळे घसरत आहेत किंमत?
ओपेकवर अधिक तेल उत्पादन करण्यासाठी ट्रम्प यांचा दबाव.
एप्रिलपासून ओपेक कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविणार.
अमेरिकाही कच्च्या तेलाचे अधिक उत्पादन वाढवणार आहे.
चीन आणि इतर देशांनीही व्यापार युद्धात उडी घेतल्याचा परिणाम.
दरम्यान, भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी हे प्रमाण कमी वेळातच ४० टक्क्यांपर्यंत वाढले.भारतातील काही रिफायनरींनी रशियन क्रूडचे पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनात रूपांतर केले आणि ते युरोप आणि इतर जी -७ देशांमध्ये निर्यात केले. युद्धानंतर रशियाने इंधनाच्या निर्यातीतून एकूण ८३५ अब्ज युरो कमावले आहेत.