अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! चांदी एका दिवसात तब्बल 1 लाखांनी घसरली, सोन्यातही घसरण..


पुणे : अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळीच सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.एका दिवसात सोने 13000 रुपयांनी तर चांदी 27000 रुपयांनी घसरली आहे.

मागच्या आठवड्यात गुरुवारी चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ झाली होती. पहिल्यांदाच चांदीचे दर 4 लाख रुपये झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चांदीचे दर 1.28 लाखांनी कमी झाले. हे दर 2,91,922रुपये झाले. MCX नुसार, त्यानंतर आज चांदीचे दर 9 टक्क्यांनी घसरले आहेत. हे दर सध्या2,65,652 रुपये झाले आहेत.

आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता अचानक अर्थसंकल्पाआधी दोन दिवस सोने-चांदीचे दर घसरले आहेत. त्यामुळे भविष्यातदेखील हे दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याचे दर मागच्या आठवड्यात सर्वाधिक वाढले होते आणि मागच्याच आठवड्यात सर्वाधिक घसरले होते. सोन्याचे दर 1,93,096 रुपयांपर्यंत पोहचले होते. लगेच दुसऱ्या दिवशी हे दर 42,247 रुपयांनी घसरुन दीड लाखांवर आले आहे. आज सोन्याचे दर 8,80 टक्क्यांन घसरले आहेत. हे दर 1,38,634 रुपये झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!