‘ नेकी का काम,आंदेकरका नाम ‘,बंडू आंदेकरची घोषणा देत एन्ट्री; पोलीस संरक्षणात भरला अर्ज

पुणे:आगामी पुणे महापालिका निवडणूकीसाठी कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबाने रिंगणात उडी घेतली आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एन्ट्री करताना ‘ नेकी का काम,आंदेकरका नाम, अशी घोषणाबाजी बंडू आंदेकरने केली. यावेळी पोलिसांच्या संरक्षणाच्या ताब्यात त्यांने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात कुख्यात गुंड बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तरीही आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आंदेकर कुटुंबाला तिकीट मिळाला आहे.पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच्यासोबत सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली.

विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे.मात्र न्यायालयाने मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास स्पष्ट मनाई केल्याने पोलिसांनी गपचूप बंडू आणि लक्ष्मी अन् सोनाली यांना क्षेत्रीय कार्यालयात आणल्यानंतर त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, पोलिसांकडून या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने करण्यात आला होता.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत. या आदेशाचं पालन केलं गेलं.
