ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! चांदीत 15 हजार रुपयांची घसरण तर सोन चक्क…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुसाट धावणाऱ्या सोने-चांदीच्या किमतींत अचानक मोठी घसरण झाली आहे.आज सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.

एमसीएक्सवर चांदीमध्ये आज 15,000 रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे.चांदीचा दर आता 2,29,872 रुपयांवर आला आहे. MCX एक्सचेंज रेटवर चांदीने 6% ने घसरण नोंदवली आहे. आज सोन्यातही 0.82% ने घसरण दिसून येत आहे. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,50,675 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी मोठी संधी आहे.

यापूर्वी, एमसीएक्सवर एप्रिल 2026 रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा करार गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 1,52,260रुपयांवर बंद झाला. हा दर त्याच्या विक्रमी उच्चांकी 1,80,779 प्रति 10 ग्रॅमपेक्षा सुमारे 28,500 रुपयांनी कमी होता.

दरम्यान अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने आज सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!