खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी!सोने 4 हजारांनी घसरले, चांदीही 6 हजारांनी स्वस्त, आजचे दर किती?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले होते.आता गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 4 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज आहे.

जळगाव सुवर्ण नगरीमध्ये सोन्याचे दर काल जीएसटी शिवाय 1,48, 000 असतांना आज त्यामध्ये चार हजार रुपयांची घसरण होऊन हेच दर 1,44,000 वर खाली आले आहेत. तर चांदीच्या दरात देखील सहा हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर हे 2,36,000 वरून 2,30,000 इतके खाली आले आहेत. युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
सोन्या-चांदीचे दर

24 कॅरेट सोन्याचे दर -149856
23 कॅरेट सोन्याचे दर- 143612
22 कॅरेट सोन्याचे दर- 137364
20कॅरेट सोन्याचे दर- 124879
18 कॅरेट सोन्याचे दर – 112392
गेल्या काही दिवसात आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सुवर्णनगरीत मोठ्या प्रमाणात झाला. येत्या काही दिवसात आता चांदीच्याही दरात मोठ्या प्रमाणात घसरण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.