सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘MPSC’ कडून मोठी भरती जाहीर, जाणून घ्या….


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र अंतर्गत औषध निरीक्षक (गट ब) पदांच्या एकूण १०९ जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होऊन २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे.

यामुळे यासाठी तयारी करावी लागणार आहे. विविध संवर्ग, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, शुल्क आणि महत्वाच्या तारखांविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

यामध्ये उमेदवारांकडे फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी असणे आवश्यक आहे. किमान शैक्षणिक पात्रता असल्यास उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जातील. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत संकेतस्थळावर माहिती दिली आहे.

तसेच अंतिम निवड स्क्रीनिंग चाचणी आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. जर स्क्रीनिंग चाचणी झाली नाही. अंतिम निवड केवळ मुलाखतीच्या गुणांवर आधारित असेल. शिफारस करण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीत ४१% गुण मिळवणे आवश्यक आहे. असे सांगण्यात आले आहे.

ऑफलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत २३ ऑगस्ट, २०२५ पर्यंत काढता येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ऑफलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट, २०२५ आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट, २०२५ आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क (application fee) रुपये ३९४ आहे आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये २९४ आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!