पुण्यातील महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी! २,८०० महिलांना मिळणार ई-पिंक रिक्षा, काय आहे योजना? जाणून घ्या..


पुणे : सध्या महिलांसाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाच्या ‘ई-पिंक रिक्षा’ योजनेंतर्गत पुणे शहरातील तब्बल २,८०० महिलांना ई-रिक्षा देण्यात येणार आहेत. यामुळे याचा त्यांना फायदा होणार आहे. याबाबत नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

महिलांना स्वबळावर रोजगार मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा सरकारचा उद्देश आहे. यामुळे महिला आपल्या पायावर उभा राहण्यास मदत होणार आहे. या योजनेद्वारे घटस्फोटित, विधवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि एकल महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

यामध्ये ब२०% अनुदान राज्य सरकारकडून, ७०% कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे, १०% रक्कम लाभार्थी महिला स्वतः भरणार असे नियम लागू करण्यात आले आहेत. ई-पिंक रिक्षा मिळवण्यासाठी इच्छुक महिलांनी पुणे आरटीओमार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे.

यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करताना महिला स्वतः रिक्षा चालवणार असल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक आहे. इच्छुक महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समिती करेल. तसेच पात्र महिलांना कर्ज देणाऱ्या मान्यताप्राप्त बँका आणि रिक्षा एजन्सींची माहिती दिली जाईल.

तसेच १०% रक्कम भरल्यानंतर, उर्वरित कर्ज आणि अनुदान मिळवून रिक्षा संबंधित महिलेला वितरित केली जाईल. ई-पिंक रिक्षा फक्त लाभार्थी महिलेकडूनच चालविली जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात पोलिस आणि परिवहन विभाग तपासणी करतील, असेही सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!