सोन्याने केला कहर, दरवाढीने तोडले रेकॉर्ड, चांदीचीही उंच उडी; पाहा आजचा भाव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज ७ डिसेंबर २०२५ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल होत मोठी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ७ डिसेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३०,५३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११९,६५३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १८२,८४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,८२८ रुपये आहे.

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११९,४३३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १३०,२९० प्रति १० ग्रॅम आहे.
तर पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११९,४३३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १३०,२९० रुपये आहे.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
