Gold Silver Rate : सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, ऐन सणासुदीच्या काळात दराने घेतली मोठी भरारी, जाणून घ्या नवीन दर…
Gold Silver Rate : ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक तोळा अर्थात १० ग्रॅम सोन्याची किंमत ११८२ रुपयांनी वाढून ७१,०६४ रुपये झाली आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्याचा भाव केवळ ३ महिन्यांत ७,७६२ रुपयांनी वाढला आहे.
१ जानेवारीला सोन्याचा भाव ६३,३०२ रुपये होता. आता या दरात मोठी वाढ झाली आहे. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या वेबसाइटनुसार, ट्रेडिंगदरम्यान चांदीनेही आज नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात २२८७ रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदी प्रतिकिलो ८१,३८३ रुपयांवर पोहोचली आहे. २०२३ च्या सुरुवातीला सोन्याचा भाव ५४,८६७ रुपये प्रति ग्रॅम होता, जो ३१ डिसेंबर रोजी ६३,२४६ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला. म्हणजेच २०२३ मध्ये त्याची किंमत ८,३७९ रुपयांनी म्हणजे 16 वाढली आहे. त्याचवेळी चांदीचा भावही ६८,०९२ रुपयांवरून ७३,३९५ रुपये प्रतिकिलो झाला. Gold Silver Rate
दरम्यान, येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर ७५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर चांदीचा दरही ८५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.
पुण्यात सोन्याचा भाव किती…
पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव ७० हजार पार झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो ८४ हजार रूपये प्रतिकिलोवर गेले आहेत. अजूनही या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.