Gold-Silver Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सोन- चांदी खरेदी करणारांसाठी आनंदाची बातमी, किंमती झाल्या कमी, जाणून घ्या…


Gold-Silver Price : सोने – चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. सोन्या चांदीचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना खिशाचा विचार न करता दागिने खरेदी करता येणार आहेत.

सोन्याचा दर ६२,५०० रुपयांच्या खाली आला तर आंतराष्ट्रीय बाजारातील भाव स्थिर असल्याचे दिसून आले. मध्यपूर्वेतील तणाव आणि व्याज दरांबाबत यूएस फेडच्या आगामी निर्णयावर गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत.

मंगळवारी Good Return नुसार २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८,०५० रुपयांनी व्यवहार करत आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ६३,३३० रूपयांनी सुरू आहे.

MCX नुसार, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ५८,०५० इतकी सुरू आहे. तसेच, २४ कॅरेट १० ग्रॅम सोने ६३,३३० रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold-Silver Price

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. १० ग्रॅम)

मुंबई – ५८,०५० रुपये
नागपूर – ५८,०५० रुपये
पुणे- ५८,०५० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. १० ग्रॅम)

मुंबई – ६३,३३० रूपये
नागपूर – ६३,३३० रूपये
पुणे- ६३,३३० रूपये

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळी सध्या चांदीचे भाव देखील घसरले आहेत. त्याचेच परिणाम स्थानिक पातळीवर दिसून येत आहेत. आज १० ग्रॅम चांदीचा भाव ७६५ रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, १०० ग्रॅम चांदीचा भाव ७,६५० रुपये सुरू आहे. १००० ग्रॅम चांदीची किंमत ७६,५०० अशी आहे. त्यामुळेच आता चांदीला जास्त मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!