बोटांत सोन्याच्या अंगठ्या, हातात पाचशेची नोट, पूजा गायकवाडचं रिल होतंय व्हायरल, आता प्रकरण वेगळ्या वळणावर…


बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा गाडीत मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. मंगळवारी रात्री सासुरे गावात कारमध्ये बर्गे हे मृतावस्थेत आढळले.

त्यांनी आत्महत्या केली असे बोलले जात असले तरी बर्गे यांनी जी दिला नाही तर त्यांच्यासोबत घातपात झाला असा नातेवाईकांचा आरोप असल्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. घातपाता आरोप केला जात असल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे.

गोविंद बर्गे आणि बार्शीतील नर्तकी पूजा गायकवाड यांच्यातील प्रेमसंबंध. दोघांमधील नातं दीड वर्षांपासून सुरू असल्याचं समोर आलं आहे. या कालावधीत गोविंद यांनी पूजाला पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि तब्बल पावणेसात लाखांचा प्लॉट भेट दिला होता. मात्र, काही काळापासून पूजा गोविंदशी बोलत नव्हती, ज्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खालावली होती, अशी माहिती समोर आली आहे.

गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर पूजाचे एक इंस्टाग्राम रिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिलमध्ये तिच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत. हातात पाचशेची एक करकरीत नोट असून त्यावर ती लिप्सिंग करताना दिसते. या ऑडिओचा आशय असा आहे – मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल.

या रिलचा आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, हे रिल तिने मृत्यूच्या आठवडाभर आधी तयार केले होते. यामुळे या प्रकरणाभोवती अधिकच गूढतेचे वातावरण तयार झाले आहे.

या रिलचा आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, हे रिल तिने मृत्यूच्या आठवडाभर आधी तयार केले होते. यामुळे या प्रकरणाभोवती अधिकच गूढतेचे वातावरण तयार झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!