Gold Rate : आनंदाची बातमी! दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे दर जाणून घ्या…

Gold Rate : सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला आता ब्रेक लागल्याचं दिसत आहे. कारण, बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर कमी फरकाने का असेना घसरल्याने दिलासा मिळाला आहे.
आज सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याचे दर घसरले आहेत. २२ आणि २४ कॅरेटचे दर घसरले आहेत. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.
कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात फार बदल झाले नाहीत. कालच्या बंद किमतीच्या तुलनेत सोन्याचा भाव थोडा कमी झाला आहे. मुंबई आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७०, ००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, लखनौ आणि जयपूर सारख्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ७७, ५०० रुपये आहे. चांदीच्या दरातही घट झाली आहे. आता त्याची किंमत ९५,९०० रुपये प्रति किलो आहे, जी कालच्या तुलनेत १, ००० रुपये स्वस्त आहे. Gold Rate
सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ झाली असली तरी किमतीतील घसरण गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आहे. दिवाळीपर्यंत चांदी एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतेअसे तज्ज्ञांचं म्हणणे आहे
मुंबई आणि कोलकाता इथे २४ कॅरेट सोन्याच्या किमती ७७,४४० रुपये प्रति तोळे आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर ७० ,९९० रुपये प्रति तोळे दर पोहोचले आहेत. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती वाढत आहेत. मात्र मागच्या दोन तिवसांपासून त्याला ब्रेक लागला असून आता दिलासा मिळाला आहे.
जागतिक बाजारातील मंदी, जिओ पॉलिटिक्स आणि इस्रायल-इराण संघर्श या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले आणि ७८, ३०० रुपयांवर पोहोचले. सोमवार हे दर ७८ ,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर होते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर नफा बुकिंगमुळे चांदी ९४ ,००० रुपये प्रति किलोवर स्थिर राहिली. याशिवाय ९९.५ टक्के शुद्धतेचे सोनेही विक्रमी पातळीवरून ४०० रुपयांनी घसरून ७७ ,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे.