Gold Rate : सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका! सोनं चांदी झालं महाग, काय आहे दर?, जाणून घ्या..

Gold Rate : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सराफा बाजारात भाव चढे आहेत, तर वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे.
नव्या दरानुसार आज सराफा बाजारपेठेमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७०,५०० रुपये इतका आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७४,०३० इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ९८,००० रुपये इतका आहे.
सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, २२ कॅरेट सोन्याच्या दर सोमवारी प्रति तोळा ७०,३५० इतका होता त्यामध्ये वाढ होऊ तो आता ७०,५०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामध्ये दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. Gold Rate
दुसरीकडे २४ कॅरट सोन्याच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे, २४ कॅरेट सोन्याचा दर सोमवारी ७३,८७० रुपये प्रति तोळा होता, त्यामध्ये वाढ होऊन तो आता ७४,०३० रुपयांवर पोहोचला आहे. याचाच अर्थ सोन्याच्या दरात १६० रुपयांची वाढ झाली आहे.