Gold Rate : लग्नसराईच्या दिवसांतच ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किंमती?


Gold Rate : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे.  गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावे की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. आता लग्नसराई चालू झाली आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी घट झालीये. तर ऐन लग्नसराईत सोनं काहीसं स्वस्त झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी हिच योग्य वेळ असल्याचं सराफा व्यवसायिक सांगत आहेत. Gold Rate

दरम्यान, आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिशी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल झाले आहेत. आज पुण्याच्या सराफा बाजारात १० ग्रॅमला ११० रुपयांनी सोनं स्वस्त झालंय. तर चांदीच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेली नाहीत.

प्रत्येक शहरात कर आणि सोन्याच्या गुणवत्तेनुसार भाव वेगवेगळे असतात. आज १५ नोव्हेंबर रोजी पुणे सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅमचा दर ७५, ७६० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ६९,४५० रुपये असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!