युद्धविरामाच्या घोषणेनं सोन सुस्साट! तब्बल 39,800रुपयांनी महागलं; 24 अन् 22 कॅरेटचा दर काय?


पुणे: गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या इराण – इस्त्राईलच्या युद्धाने एका मोठ्या विध्वसांच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. मात्र हे युद्ध अखेर तात्पुरते थांबले आहे.या युद्धविरामच्या घोषणेनंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.आज 24 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये 39,800 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

आज 24 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये 39,800 रुपयांची वाढ झाली आहे. तर 1 किलो चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोनं- चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी 24,22 आणि 18 कॅरेटच्या सोन्याचे आणि चांदीचे दर किती ते जाणून घ्या….

युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. आज 24 कॅरेटचे 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये 3980 रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला 1,53,820 रुपये खर्च करावे लागणार आहे. तर 24 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये 39,800 रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला 15,38,200 रुपये खर्च करावे लागणार आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटका बसला.

आज 22 कॅरेटचे 1 तोळा सोनं 3650 रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला 1,41,000 रुपये मोजावे लागणार आहे. मंगळवारी हे सोनं 1,37,350 रुपयांना विकले गेले. तर 22 कॅरेटचे 10 तोळा सोनं 36,500 रुपयांनी महाग झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला 14,10,00 रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!