ऐन लग्नसराईत सोन्याचे दर कडाडले!प्रति तोळा 490 रुपयांची वाढ, आजचा दर काय?


पुणे : इराण -इस्रायलच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर सराफा बाजारात आजही सोने आणि चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मुंबई,पुणे आणि दिल्लीतील बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 490 रुपयांनी वाढ झाली आहे

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 490 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो 2,60,000रुपयांवर पोहोचली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 490 रुपयांनी वाढल्याने भाव 1,52,840 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,40,400 रुपयांवर पोहोचला आहे.18 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा हा 1,14,630 रुपयांवर पोहोचली आहे.

आज सरांफा बाजारात सोन्याचे दर शनिवारी दीड लाखांच्या घरात पोहोचले आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकाचे टेन्शन वाढलं आहे.

२४ कॅरेट सोन्याचा दर किती?

मुंबई – 1,52,840 रुपये

पुणे -1,52,840 रुपये

नागपूर – 1,52,360 रुपये

दिल्ली – 1,52,990 रुपये

चेन्नई – 1,53,820रुपये

तत्पूर्वी, इराण-अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. त्यामुळे युद्ध सुरू राहिल्यास सोन्याचे दर 1 लाख 80 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!