उसळीनंतर सोन्याच्या दरात जोरदार घसरण! तब्बल 12 हजारांनी भाव कोसळला, चांदीचा दर किती रुपये?

पुणे : गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या इराण इस्त्राईलच्या युद्धाचा फटका व्यवसायिकांना देखील बसला आहे.मागच्या मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता परत घसरण झाली आहे. सोन्यात तब्बल 12 हजारांची घसरण झाली आहे तर चांदी 35 हजार रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बाजारात पुन्हा एकदा गुंतवणूकदरांचे लक्ष या मौल्यवान सोन्या चांदीच्या धातूंवर केंद्रित झाले आहे.4 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे ₹1.62 लाख प्रति 10 ग्रॅम होता. हाच दर आता घसरून ₹1.50 लाखांच्या आसपास आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात सुमारे ₹12 हजारांची घट झाली आहे. आणि लग्नसराई सोन्याचा दर कोसळल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
चांदीचा दर हे ४ मार्चला ₹2.70 लाख प्रति किलो होता. आता यात काही प्रमाणात बदल झाला आहे. आता तो दर ₹2.35 लाखांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच चांदीत तब्बल ₹35 हजारांची घसरण झालेली आहे.

अमेरिका-इराणमधील भविष्यातील परिणामाबद्दल निश्चितता आणि बाजारातील अस्थिरता वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आहे. तसेच जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोने-चांदीवर दबाव आला आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे.