सोन्याचे दर घसरले; 10 तोळ्यामागे 15000 रुपयांची घसरण, खरेदीदारांना दिलासा


पुणे :गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.ऐन लग्नसराईत आता सोन्याचे दर घसरल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.सोन्याचे दर आज प्रति तोळ्यामागे 15000 रुपयांनी घसरले आहेत.

आजच्या घडीला सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी ते १,३३,८६० रुपये आहेत. त्यामुळे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे हे दर अजून कमी करण्याची मागणी केली जात आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

२४ कॅरेटचे दर

आज १ तोळ्यामागे १,५२० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,३३,८६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १,२१६ रुपयांची घसरण झाली असून हे दर १,०७,०८८ रुपये झाले आहेत.१० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,२०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १३,३८,६०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४०० रुपये झाले आहेत. हे दर १,२२,७०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१२० रुपयांनी घसरले असून ९८,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १४००० रुपयांनी घसरले असून १२,२७,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,१५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,००,३९० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ९२० रुपयांची घसरण झाली असून हे दर ८०,३१२ रुपये झाले आहेत. तर १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची घसरण झाली असून दर १०,०३,९०० रुपये झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!