सोन्याच्या दरात घसरण कायम! आजही पडले दर, जाणून घ्या आजचा भाव…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात घट झाली आहे.

१० दिवसांपूर्वी, म्हणजेच ६ मे २०२५ रोजी, २२ कॅरेट सोन्याचा भाव ९० हजार २५० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ९८ हजार ४०७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर दोन दिवस किमती वाढल्या आणि ८ मे २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

मात्र, १२ मे २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि सोने ३ हजार २२० रुपयांनी स्वस्त झाले. या दिवशी २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५ हजार ४६० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यानंतर, काल म्हणजेच १४ मे २०२५ रोजी देखील किमतीत ५४० रुपयांची घट झाली.
आज, १५ मे २०२५ रोजी देखील सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत, याचा आढावा घेऊया.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: १८ कॅरेट सोने ७२ हजार ४० रुपये प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट सोने ९६ हजार ६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ८८ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी: १८ कॅरेट सोने ७२ हजार ७० रुपये प्रति १० ग्रॅम, २४ कॅरेट सोने ९६ हजार ९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ८८ हजार ८० रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७२ हजार ३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ हजार ५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ८८ हजार ४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी: आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७२ हजार ६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ हजार ८० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ८८ हजार ७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
