Gold Price : सोने- चांदीच्या दरात पुन्हा झाले मोठे बदल, स्वस्त की महाग?, काय आहे आजचे दर? जाणून घ्या..

Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सराफा बाजारात भाव चढे आहेत, तर वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे.

आज सोन्याच्या ७४ हजारांचा आकडा पार केला आहे. तर दररोज होणारी ही दरवाढ पाहता चांदीने जवळपास ९० हजारांचा टप्पा गाठला आहे. पुढच्या काही दिवसांत चांदीचे दर लाखाच्या घरात पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. Gold Price

आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर जवळपास १३०० रुपयांनी वाढला आहे, तर चांदीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर आज सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.

आज २४ सप्टेंबर रोजी देशात आज सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठे चढ- उचार दिसून आले आहेत. आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८०० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,८३० रुपये आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर ७३ ते ७४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत, तर तर चांदीचे दर ८७ ते ८९ हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.
