Gold Price : चार दिवसात सोन्याच्या दरात ‘एवढ्या’ रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर किती?, जाणून घ्या…


Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सराफा बाजारात भाव चढे आहेत, तर वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे.

गेल्या चार दिवसात जळगावमध्ये सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या करात सवलत दिल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या चारच दिवसात सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याच्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. Gold Price

मागणी वाढूनही सोन्याचे दर हे चारच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर हे ७४६०० वरून हे दर ७६६०० रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. वाढणारे सोन्या चांदीचे दर कधी कमी होणार असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान, या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करण्याकडं नागरिक पाठ फिरवत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!