Gold Price : सर्वसामन्यांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, पाहा आजचा भाव किती?


Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे.  गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर गडगडल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे, आजही २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा जवळपास ६०० रुपयांची घट झाली आहे. तर चांदीचा दरही ५०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे तुम्ही पण सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत नक्की जाणून घ्या.

आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी मोठ्या फायद्याची ठरत आहे. कारण लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. वधु वराचे दागिने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकांनांमध्ये लगबग दिसून येत आहे. अशात सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकही दिलासा व्यक्त करत आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,६१० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,६१३ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ८९६ रुपये आहे. आज सोन्याचा दर तब्बल ५९० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. Gold Price

त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास १२०० हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर ५९० रुपयांनी कमी झाला आहे.

त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ८९ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज २०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ५०० पयांनी घसरला आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहे.

शहर         २२ कॅरेट सोन्याचा दर                                                                २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई    २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६८,५४८ रुपये आहे.          २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,७८० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे     प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे.              २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे.

नागपूर   प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे.            २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे.

नाशिक  प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे.            २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!