Gold Price : सोन्याच्या दराला ब्रेक, दिवाळी पाडव्याच्या दिवशी जाणून घ्या नवीन दर….

Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातही दिवाळीत सोन्याच्या मागणीत वाढ होते.
तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, सोन्याच्या दरवाढीला आता ब्रेक लागल्याचं दिसत असून आता घसरणीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी घसरण झाली आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर काय आहेत.
वेबसाईटनुसार, शनिवारी (ता.२) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८,०५, ६०० रुपयांवरुन ८,०४,००० रुपये इतका झाला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १६० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर ८० ५६० रुपयांवरुन ८०,४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे
शहराचे नाव आजचा सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा दर (प्रति १०ग्रॅम)
मुंबई 80,400 रुपये 80,560 रुपये
पुणे 80,400 रुपये 80,560 रुपये
नागपूर 80,400 रुपये 80,560 रुपये
कोल्हापूर 80,400 रुपये 80,560 रुपये
जळगाव 80,400 रुपये 80,560 रुपये
सांगली 80,400 रुपये 80,560 रुपये
बारामती 80,400 रुपये 80,560 रुपये