Gold Price : दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी, दरात झाली मोठी वाढ, चांदीच्या दरातही तेजी, जाणून घ्या..

Gold Price : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली असून चांदीचे दर देखील वधारले आहेत. नागपुरात २४ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा ७९,३१० रुपयांवर पोहोचले आहेत. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच दुसरीकडे मुंबईमध्ये २२ कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा ७१, ४१० रुपये प्रति तोळा एवढे आहेत तर २४ कॅरट सोन्याचे दर ७७,८९० रुपये प्रति तोळा एवढा आहे. Gold Price

दरम्यान, सोन्याचे भाव वाढतच असून, डिसेंबरपर्यंत सोन्याचे दर ८५ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न खरेदीदारांच्या समोर आहे.