Gold Price : सोनं अजूनच वधारलं! सणासुदीच्या काळात आणखी महागलं, जाणून घ्या आजचे भाव…


Gold Price : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

या वाढीसह २४ कॅटेरच्या सोन्याचा भाव थेट ८० हजाराच्या पुढे गेला आहे. आज एका दिवशी २४ कॅरेटचं सोन ४५० रुपयांनी महागलं आहे. या भाववाढीसह २४ कॅरेट सोन्याचा दर ८०२५.3 रुपये प्रति ग्रॅम तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३५८.३ रुपये प्रति ग्रॅम जाला आहे. चांदीचा सध्याचा भाव १०७२००.० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

दिल्लीमध्ये चांदीचा दर १०७२००.० रुपये प्रति एक किलोवर पोहोचला आहे. २३ऑक्टोबर रोजी हा दर १०४२००.० रुपये होता. गेल्या आठवड्यात १८ ऑक्टोबर रोजी चांदीचा हा दर १०००००.० रुपये होता.

मुंबईत सोन्याचा भाव किती?

मुंबईत आज सोन्याचा दर ८०१०७.० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. काल म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव ७९६७७.० रुपये प्रति १० ग्रॅम होता. आठवड्याभरापूर्वी सोन्याचा भाव ७८१४७.० रुपये प्रति १० ग्रॅम होता.

दरम्यान, मुंबईत चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव १०६५००.० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर २३ तारखेला चांदीचा दर १०३५००.० रुपये प्रति किलो होता. आठवड्याभरापूर्वी 18 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर९९३००.० रुपये प्रति किलो होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!