खुशखबर! सोनं झालं स्वस्त, १० ग्रॅमच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या आजचे दर…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना अखेर वर्षअखेरीस ब्रेक लागला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. अखिल भारतीय सराफ संघाच्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावरून खाली आला आहे.

मागील सत्रात सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 42 हजार 300 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र आता नफा वसुलीमुळे दरात घट झाली असून सोनं पुन्हा स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येत आहे.

       

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 41 हजार रुपयांवर आला आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 36 हजार 233 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 25 हजार 291 रुपये नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, 18 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 1 लाख 2 हजार 586 रुपयांवर व्यवहार करत असून 14 कॅरेट सोन्याचा दर 80 हजार 17 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून प्रति औंस दर 4,462.96 डॉलरवर आला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी 2026 डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव किरकोळ वाढीसह 1 लाख 40 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर कॉमेक्सवर सोन्याच्या वायदा दरात मर्यादित वाढ दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण मुख्यतः व्यापाऱ्यांच्या नफा वसुलीमुळे झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!