सोने खरेदी करताय ? यापुढे असे सोने चालणारच नाही; मोदी सरकारचा नवा नियम; जाणून घ्या…!
नवी दिल्ली : तुम्हीही सोन्याचे दागिने करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे . सोन्याबाबत केंद्र सरकारने नवा नियम बनवला आहे.
या नियमानुसारच सोन्याची खरेदी-विक्री होईल. नाहीतर तुमचे सोने ग्राह्यच धरले जाणार नाही. यापुढे सोने आणि सोन्याच्या दागिने 6 डिजीट अल्फान्युमेरिक HUID हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री करताच येणार नाही.
म्हणजे असे सोने ग्राह्य धरले जाणार नाही, 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू होणार आहे. असे सरकारने सांगितले आहे.
तसेच, हॉलमार्किंग हा सोन्याची शुद्धता ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह आहे आणि हॉलमार्किंग केंद्राच्या लोगोसह सोन्याची शुद्धता देखील लिहिलेली असूण, तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे.
दरम्यान, ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रार करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तात्काळ माहितीही मिळणार आहे.